लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. सध्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही बहुमताच्या आकड्याच्या वर आहे. मात्र ३०० पारची स्थिती अद्याप नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत ४०० पारच्या घोषणा केल्या होत्या. मात्र तो पल्ला गाठण्याची शक्यता सध्या कमीच आहे. यंदा इंडिया आघाडीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात चुरशीची लढत दिली. त्यामुळे त्यांचेही मनोबल वाढले आहे. दरम्यान भाजपच्या निकालावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व क्षमतेवर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी ट्विटर एक्सवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले गेहलोत?

२०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याभोवती केंद्रित केली. मोदींची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार या सारख्या खोट्या घोषणा भाजपा या शब्दापेक्षा अधिक प्रमाणात दिसून आणि ऐकू येत होत्या. इतकेच नव्हे तर लोकसभा उमेदवारांना टाळून सर्व निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर लढवली जात होती. निवडणुकीत महागाई, बरोजगारी हे प्रश्न गौण झाले आणि केवळ मोदी मोदी हेच ऐकू येत होते. पंतप्रधानांनी आपल्या नेतृत्त्वात ३७० आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ४०० जागा पार होतील, असा दावा केला होता. मात्र आता असे होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत देखील मिळत नाहीये. असे असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची दावेदारी सोडायला हवी, असा टोला अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदी यांना लगावला.

हेही वाचा – “नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा”; काँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी

हेही वाचा – काँग्रेसच्या सत्तेच्या आशा पल्लवित; शिंदे, नायडूंसह ‘एनडीए’तल्या घटकपक्षांशी संपर्क सुरू

यंदाचे लोकसभा निवडणुकीचे परिणाम हे २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकीच्या अगदी वेगळे आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांना चांगलाच फटका बसला होता. मात्र यंदा विरोधकांची एकत्रित इंडिया आघाडीने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चुरशीची लढत दिली आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी ते ३०० च्या खाली आहे. तर इंडिया आघाडीने दोनशेच्यावर जागा मिळवल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok gehlot comment on pm narendra modi says bjp does not have a clear majority in the name of pm modi ssb