पीटीआय, भरतपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत भ्रष्टाचाराच्या पैशांनी काँग्रेसची तिजोरी भरत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. याच कारणामुळे पक्षातर्फे नेहमी त्यांनाच प्राधान्य दिले जाईल, सचिन पायलट यांना कधीही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार नाही, असा दावाही शहा यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट हा वाद पुन्हा उफाळला आहे, त्यावरून शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

पायलट यांनी कोणतेही निमित्त साधून धरणे आंदोलन करू दे, पक्षाची तिजोरी भरण्यात त्यांचे योगदान कमी आहे, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा क्रमांक काही येणार नाही, असे म्हणत शहा यांनी पायलट यांना डिवचले. शहा म्हणाले की, गेहलोत यांनी  राजस्थान सरकारला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले आहे, त्यांनी राज्याची लूट केली आणि त्यातून पक्षाची तिजोरी भरली.

Story img Loader