तालिबानने काबूलची राजधानी ताब्यात घेण्यापूर्वीच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून निघून गेले होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला आहे. भारताने नेहमीच तालिबानला विरोध केला आहे. म्हणूनच अफगाणिस्तानसोबत यापूर्वी मैत्रीचे संबंध होते म्हणून आता तालिबानबाबत भारताची भूमिका काय असले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वेगळाच सूर लावला आहे., भारताने अशरफ घनी यांना आश्रय दिला पाहिजे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. “भारताने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती डॉ.अशरफ घनी यांना येथे राहण्याचे आमंत्रण द्यावे. ते तुलनेने उच्च शिक्षित आहेत आणि तालिबानने आधुनिक अमेरिकी शस्त्रास्त्रांसह पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसखोरी केली तर ते भारताला मदत करु शकतात,” असे खासदाराने म्हटले आहे.
, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
India should invite Fmr Afghanistan President Dr. Ghani to live in India. He is relatively highly educated ( mostly in US) and can help India to form a future emigre Afghan government when Taliban infiltrates PoK with modern US army weapons.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 19, 2021
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैसे घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं घनी यांनी म्हटलं आहे. तसेच हे आरोप राजकीय हेतूने आणि छबी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप घनी यांनी केल्याचं अल झजीराने दिलेल्या वृत्तात म्हटलं.
दरम्यान, राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत.
काबूल हे राजधानीचे शहर तालिबानने काबीज केल्यानंतर आपण रक्तपात टाळण्यासाठी रविवारीच देश सोडला असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. शहरातील साठ लाख लोकांसाठी ही मोठी मानवी शोकांतिका आहे, कारण त्यांना आता त्यांचे भवितव्य माहिती नाही, असंही घनी यांनी म्हटलं होतं.