अमेरिकन एजन्सीने दावा केला आहे की, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी यांनी देश सोडताना आपल्या सोबत एक मिलियन डॉलर पेक्षाही कमी रक्कम घेऊन गेले होते. SIGAR (स्पेशल इंस्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन), जी एजन्सी अफगाणिस्तानमधील पुनर्बांधणीची चौकशी करत आहे तिचे म्हणणे आहे की, समोर आलेल्या पुराव्यांनुसार अशरफ घनी तीन हेलिकॉप्टरमध्ये ५००,००० डॉलर घेऊन गेले होते.
१५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केला तेव्हा अशरफ घनी आपल्या काही जवळचे सहकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अफगाणिस्तानातून पळून गेले होते. आता ‘सिगार’ने राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, संरक्षण मंत्रालय आणि इतर अनेक माजी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा अहवाल तयार केला आहे. अमेरिकेच्या एजन्सीचे म्हणणे आहे की, त्यांनी या संदर्भात अशरफ घनी यांना काही प्रश्न देखील पाठवले होते, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.
अहवालात आणखी काय म्हटले आहे? –
‘सिगार’चे प्रमुख जॉन सोप्को यांनी अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तान सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर, अनेक मीडिया आउटलेटमध्ये असे वृत्त आले होते की, माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अशरफ घनी आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार अफगाणिस्तान सोडताना अनेक दशलक्ष डॉलर्स घेऊन उज्बेकिस्तानला गेले होते.
एजन्सीचे म्हणणे आहे की, तालिबान काबूलमध्ये पोहोचल्यानंतर माजी अध्यक्ष घनी आणि त्यांचे सहयोगी हे अनेक मिलियन डॉलर्स घेऊन गेले नव्हते. एजन्सीच्या रिपोर्टनुसार त्यांना अशा काही अस्पष्ट माहिती देखील मिळाली होती की, ज्यानुसार राष्ट्रपती भवनात उपलब्ध असलेले जवळपास पाच मिलियन डॉलर माजी राष्ट्राध्यक्ष घनी यांच्या विशेष अंरक्षकांच्या हाती लागले होते आणि जेव्हा तालिबान राष्ट्रपती भवनाच्या दिशेने येत होता, तेव्हा त्या अंगरक्षकांमध्ये या रक्कमेच्या वाटपावरून वाद देखील झाला होता आणि हा पैसा राष्ट्रपती भवनासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन ते चार वाहनांमधून तिथून नेण्यात आला.
लोकांमध्ये वाटण्यात आली होती रक्कम –
सिगारच्या अहवालात हे देखील म्हटले आहे की, अफगाण सरकार संपुष्टात आल्याबरोबर नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सिक्योरिटीज(एनडीएस)वर देखील लाखो डॉलर्स हडप करण्याचा आरोप करण्यात आला होता. सिगारचे म्हणणे आहे की, एका सूत्रानुसार २०२१ मध्ये एनडीएसच्या ऑपरेशनसाठी ७० मिलियन डॉलरची नगदी रक्कम जमा करण्यात आली होती. अंदाज आहे की यातील बहुतांश रक्कम तालिबानच्या विरोधातील मोहिमेवर खर्च करण्यात आला होता. तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार, अफगाण सरकारच्या शेवटच्या दिवसांमध्ये ही रक्कम लोकांमध्येही वाटली गेली होती, जेणेकरून ते शस्त्रे खरेदी करू शकतील आणि स्थानिक पातळीवर स्वतःचे संरक्षण करू शकतील. परंतु दुसर्या माजी अधिकाऱ्याने सिगारला सांगितले की अफगाण चलन अस्तित्वात असले तरी, काबुल ताब्यात घेण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी ही रक्कम गमावलेली होती.
सिगारच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, घनी अफगाणिस्तान सोडताना दोन अधिकाऱ्यांकडे पैसे होते. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा रक्षकाकडील एका बॉक्समध्ये दोन लाख डॉलर्स होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या एका माजी अधिकाऱ्याजवळ प्रवासादरम्यान एका बॉक्समध्ये २४० हजार डॉलर्स होते. काही स्त्रोतांनी सिगारला सांगितले की, अफगाणिस्तान सोडताना प्रत्येक व्यक्तीकडे ५ हजार ते १० हजार डॉलर्स होते.
याशिवाय रिपोर्टनुसार, अशरफर घनी, त्यांच्या पत्नी आणि काही लोकांना उझबेकिस्तानच्या विमानतळावरून संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेऊन जाण्यासाठी एक विमानला १२० हजार डॉलर देण्यात आले आणि ते याच रकमेतून देण्यात आले होते. काबूल सोडताना अशरफ घनी यांनी आपल्यासोबत तीन हेलिकॉप्टरमध्ये ६० दशलक्ष डॉलर्स घेतले होते, असे काही रशियन सूत्रांनी उघड केले होते. मात्र घनी हे आरोप फेटाळून लावले होते.