भारत-अमेरिका संरक्षणविषयक संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे अमेरिकेचे संरक्षण उपमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी येत्या डिसेंबर महिन्यात आपण पदाचा त्याग करीत असल्याचे जाहीर केले आहे.आता जबाबदारीतून मुक्त होण्याची वेळ समीप आली असल्याचे कार्टर यांनी राजीनामापत्रात म्हटले असले तरी ओबामा प्रशासन सोडण्याच्या आपल्या निर्णयाचे निश्चित कारण काय ते स्पष्ट केलेले नाही. येत्या ४ डिसेंबर रोजी ते मुक्त होणार आहेत, असे संरक्षणमंत्री चक हॅजेल यांनी सांगितले. कार्टर हे असामान्य निष्ठा असलेले उपमंत्री होते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत ११ संरक्षणमंत्र्यांच्या हाताखाली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम केले होते.