उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील किल्ल्यात एक हजार टन सोन दडवले असल्याचे स्वप्न एका साधुला पडले आणि केंद्र सरकार कामाला लागले. पुरातत्त्व विभागाने सलग १२ दिवस या किल्ल्यात खोदकाम केले. मात्र त्यांना येथे सोन्याचा साधा तुकडाही सापडला नाही. मात्र तरीही जागे न झालेल्या पुरातत्त्व विभागाने आपली शोधमोहीम न थांबवता खोदकाम आणखी काही भागांत करण्याचा निर्णय घेतला
आहे.
पुरातत्त्व विभागाच्या १२ जणांच्या पथकाने १२ दिवसांत ४.८० मीटपर्यंत खोदकाम केले आहे. मात्र त्यांना केवळ काही पुरातन भांडी आणि शिल्पे सापडली आहेत. ही भांडी व शिल्पे पहिल्या शतकातील असावी, असा पुरातत्त्व विभागाचा अंदाज आहे. ४.८० मीटरवर पुरातत्त्व विभागाला जमिनीतील वाळूचा स्तर लागला आहे. त्यामुळे येथील खोदकाम बंद करून इतर ठिकाणी खोदकाम करण्यात येणार आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले. ‘उत्खनन हे कंटाळवाणे काम नसून, उत्साहवर्धक काम आहे,’ असे सांगण्यासही ते विसरले नाही.
भारतीय भूगर्भशास्त्र विभागाचे पथक यासंदर्भात पुरातत्त्व विभागाला सहकार्य करत आहे. त्यांच्या सल्ल्यानेच या परिसरातील गंगा नदीकाठी काही ठिकाणी उत्खनन करण्यात येणार आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
उन्नावचा सुवर्णमृग!
मनशोभन सरकार..
उन्नावच्या किल्ल्यात काय सापडले?
पहिल्या शतकातील काही भांडी. मातीच्या काळय़ा भांडय़ाचे तुकडे, काचेच्या बांगडय़ा, लोखंडी नखे, हॉपस्कॉच हा खेळ, सिंहाच्या शिल्पाचा तुकडा, सुपारीच्या आकाराचे मोठे मणी. या सर्व वस्तू पहिल्या, सातव्या, १७व्या आणि १९व्या शतकातील आहेत.