पाकिस्तानात पुढील आठवडय़ात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळापत्रकापेक्षा एक आठवडा अगोदर घेण्याचे आदेश दिल्याने बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्यापुढे अन्य पर्यायच नव्हता, असे पक्षाने म्हटले आहे.
ही निवडणूक ३० जुलै रोजी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने प्रचारासाठी वेळ अपुरा पडत आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते रझा रब्बानी यांनी म्हटले आहे.

Story img Loader