लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याची सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेतील तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे साक्ष नोंदविली जात आहे. पाकिस्तानातील ‘आयएसआय’ने ISI लष्कर-ए-तोयबाच्या साथीने मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचा दावा करून हेडलीने २६/११च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ‘आयएसआय’साठी हेरगिरी करतील अशी माणसे भारतीय सैन्यात भरती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा हेडलीने मंगळवारी केला. हेडलीच्या या खुलाशामुळे पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे. लष्कर-ए-तोयबावर अमेरिकेने घातलेल्या बंदीला कायदेशीर आव्हान देण्याचा सल्लाही आपण हाफीज सईद आणि लख्वी यांना दिला होता, असेही हेडलीने कबुल केले आहे. यासोबतच मुंबई हल्ल्यावेळी नौदल, वायूदल आणि पोलीस मुख्यालयासोबतच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराही लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होते, असे हेडलीने जबाबात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा