गोलपारा जिल्ह्यातील गेंदामारी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांरांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणानिमित्त रविवारी गावामध्ये काही नागरिक एकत्र बसले होते. त्यावेळी रात्री ९च्या सुमारास आठ बंदुकधारी दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित गारो नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (जीएनएलए) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आसाम-मेघालयाच्या सीमेवर हे गाव आहे. निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून येथे तणावाचे वातावरण आहे.

Story img Loader