‘एनडीएफबी’ (नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड) या फुटीरतावादी संघटनेच्या सदस्यांनी  घडवलेल्या आदिवासी हत्याकांडातील बळींची संख्या ६५वर पोहोचली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आसाम राज्यात बुधवारी हिंसाचार उसळला. संतप्त आंदोलकांनी पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. काही ठिकाणी घरांना आगी लावल्या. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघे ठार झाले.
‘एनडीएफबी’च्या सोन्गबीजित गटातील शस्त्रसज्ज फुटीरतावाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्य़ात ३१ जण ठार झाले. तर कोक्राझार येथे २५ आणि चिरांग जिल्ह्य़ात ३ जण ठार झाले. यात २१ महिला आणि १८ मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्याकांडानंतर..
*आसाम राज्य सरकारच्या विनंतीनंतर निमलष्करी दलाचे ५ हजार जवान घटनास्थळी तैनात
*राज्याच्या विविध भागांत सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून तातडीची पावले
*सोनितपूर जिल्ह्यातील धेकियाजुली येथे पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या जमावावर पोलिसांचा गोळीबार
*वारंवार विनंती करूनही जमावाने माघार घेतली नाही. आदिवासींची हातात धनुष्यबाण आणि इतर शस्त्रे घेऊन पोलीस ठाण्यावर हल्ल्याचा प्रयत्न. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा गोळीबार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुटीरतावाद्यांकडून करण्यात आलेला हा सर्वात भ्याड हल्ला आहे. ही एक प्रकारची दहशतच आहे. सरकार याला जशास तसे उत्तर देईल.
राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

फुटीरतावाद्यांकडून करण्यात आलेला हा सर्वात भ्याड हल्ला आहे. ही एक प्रकारची दहशतच आहे. सरकार याला जशास तसे उत्तर देईल.
राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री