दोन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये काम केलेले आणि २०१५ साली भाजपामध्ये प्रवेश केलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधी राजकारणासाठी योग्य नाहीत, असे विधान केले आहे. तसेच राहुल गांधी यांना गांभीर्य नाही. त्यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे आहेत, अशी टीकाही हिमंता बिस्वा शर्मा यांनी केली.

हेही वाचा >>> Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मल्लिकार्जून खर्गेही निवडणुकीच्या रिंगणात

एखादी बैठक सुरू असताना राहुल गांधी मध्येच निघून जातात. खोलीत गेल्यानंतर ते अर्धा-अर्धा तास परत येत नाहीत. बैठक सुरू असताना ते मध्येच व्यायाम करण्यासाठी निघून जातात. त्यांच्यामध्ये विषय़ाचे गंभीर्य नाही. त्यांनी २०१९ साली काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीमाना दिला. मात्र अजूनही पक्षाला कोण चालवत आहे? भारत जोडो यात्रेचे नेतृत्व कोण करत आहे. म्हणजेच राहुल गांधी यांना कोणतीही जबाबदारी न स्वीकारता सत्ता आणि अधिकार हवे आहेत. लोकशाहीमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही जबादारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे असतील तर ते खूप घातक असते,असे हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.

हेही वाचा >>>भडकाऊ भाषण प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी शर्जिल इमामला जामीन मंजूर

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात. पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे अध्यक्षपद सोडलेले असूनही सर्व पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीमागे का उभा राहतो? गांधी कुटुंबीय गरीब लोकांकडे जात आहेत. मात्र गरीब लोक कधीतरी गांधी कुटुंबाकडे गेलेले पाहिले आहे का? गांधी कुटुंबीय जेथे जेवतात तेथेच एखादी गरीब व्यक्ती जेवल्याचे तुम्ही पाहिलेले आहे का? असे सवालही हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला आहे.

Story img Loader