पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, सुमारे पाच लाख नागरिक बाधित झाले आहेत. पुरामुळे एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील प्रमुख नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (एएसडीएमए) अहवालानुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत चार लाख ९५ हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. उदलगुरी जिल्ह्यातील तामुलपूर येथे पुरामुळे एकाचा मृत्यू झाला. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार ब्रह्मपुत्रा नदी नेमतीघाट (जोऱ्हाट) आणि धुबरी येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुथिमारी (कामरूप), पगलागिया (नलबारी) आणि मानस (बारपेटा) या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. विभागीय हवामान केंद्राने शुक्रवारी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Syphilis cases increase in city Mumbai
सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
Mystery Illness in Jammu and Kashmir
Jammu and Kashmir Mystery Illness : जम्मू काश्मीरच्या राजौरीतील एका गावाला गूढ आजाराचा विळखा; मृतांची संख्या ८ वर

राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील १६ जिल्हे आणि चार उपविभाग पूरग्रस्त झाले आहेत. बजाली उपविभागास पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. येथील दोन लाख ६० हजार नागरिक बाधित झाले आहेत. सात जिल्ह्यांतील ८३ मदत छावण्यांत १४ हजारांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तसेच ७९ मदत वितरण केंद्रे कार्यान्वित आहेत.

Story img Loader