आसाममधील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जमीन करार करून देण्याच्या मागणीसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनेतील एका सदस्याने आत्मदहन केले. तो शंभर टक्के भाजला असून त्याचे प्राण वाचण्याची शक्यता कमी आहे.
आसाममध्ये अशा प्रकारची घटना प्रथमच घडली असून त्यानंतर रस्ते रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. आत्मदहन करणाऱ्या इसमाचे नाव प्रणव बोरो असे असून त्याने कृषक मुक्ती संग्राम समिती या संघटनेने आयोजित केलेल्या आंदोलना वेळी सचिवालयासमोर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.
बोरो याला गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो १०० टक्के भाजला असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ.रामेन तालुकदार यांनी सांगितले. बोरो याने पेटवून घेतल्याचे वृत्त समजताच राज्यात अनेक ठिकाणी रेल रोको व रास्ता रोको करण्यात आले. अतिरिक्त पोलिस महासंचालक ए.पी.राऊत यांनी सांगितले, की गोलघाट, शिबसागर येथे रास्ता रोको तर जोरहाट येथे रेल रोको करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. त्यात जोरहाट जिल्ह्य़ातील कोलियापानीचा समावेश आहे. शिवसागर जिल्ह्य़ात गौरीसागर येथेही १० निदर्शकांना अटक करण्यात आली. गुवाहाटी, गोलघाट, जोरहाट येथे संघटनेच्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मोरीगाव व सोनितपूर जिल्ह्य़ातही रेल्वेमार्ग अडवण्यात आले. जोरहाट, तिनसुकिया, शिबसागर जिल्ह्य़ात अनेक लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून घोषणा देत होते.
जमीन कराराच्या मागणीसाठी आसामात आत्मदहनाचा प्रयत्न
आसाममधील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जमीन करार करून देण्याच्या मागणीसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनेतील एका सदस्याने आत्मदहन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-02-2014 at 01:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam man sets himself ablaze demanding land rights