आसाम आणि मिझोरम या राज्यात झालेल्या सीमा वादानंतर केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर-पूर्व राज्यातील सीमा वाद संपण्यासाठी आता उपग्रहाची मदत घेतली जाणार आहे. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्रश्न सोडवला जाणार आहे. हे काम पूर्वोत्तर स्पेस एप्लीकेशन सेंटरकडे सोपवलं आहे, असं केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे सीमा वाद सोडवला जाईलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं.
गेल्या महिन्याभरापासून पूर्वेकडील आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधला तणाव पराकोटीचा वाढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन राज्यांमध्ये सुरू असलेला वाद आता हिंसक स्वरूप घेऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही राज्यांच्या सीमवर झालेल्या गोळीबारात ५ आसाम पोलिसांचा मृत्यू झाला असून एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही राज्यांमधले संबंध पराकोटीचे ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना आता हे प्रकरण त्याही पुढे गेलं आहे. एकीकडे आसाम पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मिझोराम पोलिसांच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली असताना मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
अमानुष! आंध्र प्रदेशात ३०० कुत्र्यांना विष देऊन मारलं?
मिझोराम-आसाम सीमा आता वादाचा मुद्दा काय?
मिझोराममधील तीन जिल्हे आयजोल, कोलासिब आणि ममित हे आसाममधील कछर, करीमगंज आणि हैलाकांडी या जिल्ह्यांना लागून आहेत. तिन्ही जिल्ह्यांमधून आसाम-मिझोरामची १६४.६ किमीची लांब सीमा आहे. १९५० मध्ये आसाम भारतातील एक राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यावेळी आसाममध्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोराम या प्रदेशांचाही समावेश होता. नंतर हे राज्य अस्तित्वात आले आणि पूर्वीच्या सीमावादाने डोकं वर काढलं. नॉर्थ इस्टर्न एरिया कायदा- १९७१ प्रमाणे आसामाची विभागणी करून मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही राज्य तयार करण्यात आली.
“…तर सरकारी नोकरी आणि पासपोर्ट मिळणार नाही”, काश्मीर प्रशासनाचा आदेश
त्यानंतर १९८७ च्या मिझो शांतता करारनुसार मिझोराम वेगळं राज्य तयार करण्यात आलं. केंद्र सरकार आणि मिझो आदिवासी समुदाय यांच्यात झालेल्या करारानुसार ही विभागणी करण्यात आली होती. त्याला आधार होता १९३३ चा करार. असं असलं तरी १८७५ IRL चा स्वीकार केलेला असल्याची भूमिका मिझो आदिवासी समुदायाकडून घेतली जाते. त्यामुळे हा वाद अजूनही सुटलेला नाही.