नागाव जिल्ह्यात उलुनानी येथे बस दरीत कोसळून पाच महिलांसह नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. ही बस लखीमपूर जिल्ह्यातून प्रवाशांना घेऊन गुवाहाटीला जात होती. ती बस छोट्या पुलाच्या कठड्यावर आदळून पहाटे दीडच्या सुमारास खोल खड्ड्यात कोसळून हा अपघात झाला, असे पोलिस अधीक्षक अरिबदा कलिता यांनी सांगितले.
   बस चालकासह आठ जण जागीच ठार झाले. एक महिला जखमी झाली होती तिचे रूग्णालयात निधन झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना कलिता येथील गुवाहाटी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचलेल्या प्रवाशांना खास बसने गुवाहाटीला पाठवण्यात आले, त्यानंतर ते गुवाहाटीहून रेल्वेने दिल्लीला जाणार होते. मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा