तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून भारतातील अनेक लोकही तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत. यासंदर्भात यूपी, दिल्ली, आसामसह काही राज्यांतून सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांना यावर कडक कारवाई केली आहे. आसाम पोलिसांनी १४ तालिबान समर्थकांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आसाममध्ये १४ जणांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून या अटक करण्यात आल्या आणि त्यांच्यावर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी ट्वीट करत सोशल मिडीयावर पोस्ट करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफगाणिस्तान तालिबान वादावर पोस्ट लाईक करतांना देखील सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. जीपी सिंह म्हणाले, आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी १४ लोकांना अटक केली आहे ज्यांनी बेकायदेशीर पोस्ट केल्या आहेत.

१५० भारतीयांचं अपहरण नाट्य? वाचा नेमकं काय घडलं काबूल विमानतळावर!

“अफगाणिस्तानातील ती दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती”, जो बायडेन यांची भावनिक प्रतिक्रिया!

आसाम पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियावर सतर्क आणि देखरेख करत आहोत. मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली. दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam police arrest 14 over social media posts supporting taliban takeover of afghanistan srk