आसामच्या करीमगंज जिल्ह्यात सासरच्या मंडळींनी जबरदस्ती महिलेला अ‍ॅसिड पाजवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन बेगम असे त्या मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी नवरा शकील अहमद आणि त्याच्या आईला अटक केली आहे.

हेही वाचा- मोबाईलद्वारे ‘इंटरनेट’चा शहरी भागात सर्वाधिक वापर ; ग्रामीण भागात ८३ टक्के प्रमाण

मुलगी जन्माला आली म्हणून पाजवले अ‍ॅसिड 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमनाच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता. मात्र, तिने मुलीला जन्म दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमनावर सासरच्या मंडळींकडून शाररीक आणि मानसिक छळ होत होता. अखेर चिडलेल्या नवऱ्याने सुमनाला मारहाण केली आणि त्यानंतर तिला अ‍ॅसिड पिण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारात शकीलच्या आईनेही त्याला साथ दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. करीमगंज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पद्मनाभ बरुआ यांनी, मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

हेही वाचा- संसदेच्या आवारात निदर्शनांना मनाई ; नव्या वादाला तोंड, ‘बंदीहुकमा’वर विरोधकांचा आक्षेप

नवऱ्यासह सासूला अटक

घटनेनंतर सुमनालाल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शकील आणि त्याच्या आईला अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader