काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चुंबन घेणे महिलेच्या जिवावर बेतले आहे. त्यांचे चुंबन घेणा-या महिलेला तिच्या पतीने जीवंत जाळले यात तिचा मृत्यू झाला असून पतीनेही स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती आहे. यात तो ४० टक्के भाजल्याचे वृत्त आहे.
राहुल गांधी बुधवारी आसाम दौ-यावर असताना स्वयंसहाय्यता बचतगटांच्या महिला प्रतिनिधींशी चर्चा करत होते. या चर्चेनंतर काही महिलांनी त्यांच्याशी हात मिळविण्याचा प्रयत्न केल तर, एका महिलेने त्यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिला कार्यक्रमावरुन परतल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचे पर्यावसन महिलेला जिवंत जाळण्यात झाले. त्यानंतर त्याने स्वतःलाही पेटवून घेतले. तो ४० टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
युवराजांचे चुंबन घेणे महिलेच्या जीवावर बेतले
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा चुंबन घेणे महिलेच्या जिवावर बेतले आहे.
First published on: 01-03-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam woman who attended rahul event dies of burn injuries nothing to prove she kissed him