बांगलादेशात तीन ब्लॉगर्सवर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात दिवंगत ब्लॉगर अविजित रॉय यांच्या प्रकाशकाचाही समावेश आहे. अहमेदूर रशीद तुतुल (वय ४३), रणदीपम बसू ( वय५०), तारीक रहिम (वय ३०) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील तुतुल यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुधाश्वर प्रकाशनाच्या कार्यालयानजीक हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी गोळ्याही झाडल्या तसचे चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी त्या तिघांना जखमी अवस्थेत कोंडून घातले व पळून गेले. तुतुल यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुधाश्वर प्रकाशन ते चालवतात. आतापर्यंत या वर्षी चार ब्लॉगर्सची हत्या झाली आहे.

Story img Loader