Tripura, Meghalaya & Nagaland Assembly Election Results 2023 Updates : ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी ) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी ( एनपीपी ) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Assembly Election 2023 Result Updates Tripura, Meghalaya, Nagaland Vote Counting Live : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड निवडणूक निकालाचं अपडेट जाणून घ्या…

21:26 (IST) 2 Mar 2023
लोकशाहीवरील विश्वास मजबूत करणारा निकाल- नरेंद्र मोदी

भारतीय जनता पार्टीने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयामध्ये सत्ता कायम ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयोत्सवासाठी नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पोहोचले. भाजपा मुख्यालयात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. “आजचे निकाल लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा पूर्ण विश्वास असल्याचं दर्शवतात,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

19:51 (IST) 2 Mar 2023
मेघालय विधानसभा निवडणूक निकाल -२०२३

एकूण जागा – ६०

एनपीपी- २६

यूडीपी-११

काँग्रेस- ०५

टीएमसी- ०५

काँग्रेस-०२

एका जागेवर अद्याप मतमोजणी सुरू आहे…

19:51 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल -२०२३

त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल -२०२३

एकूण जागा – ६०

भाजपा- ३३

सीपीएम- १४

टीएमपी-१३

19:50 (IST) 2 Mar 2023
नागालँड विधानसभा निवडणूक निकाल -२०२३

नागालँड विधानसभा निवडणूक निकाल -२०२३

एकूण जागा – ६०

एनडीपीपी- ३७

एनपीएफ- ०२

अन्य- २१

काँग्रेस -००

19:37 (IST) 2 Mar 2023
ईशान्य भारतासाठी ऐतिहासिक दिवस- अमित शाह

हा दिवस ईशान्य भारतासाठी 'ऐतिहासिक दिवस' आहे. शांतता, विकास आणि समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला लोकांची पसंती असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. – अमित शाह

18:35 (IST) 2 Mar 2023
मेघालयात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, मुख्यमंत्र्यांचा पाठिंब्यासाठी अमित शाहांना फोन

मेघालय विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही आहे. त्रिशंकू परिस्थिती झाल्यामुळे मुख्यमंत्री संगमा यांनी गृहमंत्री अमित शाहांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. संगमा यांनी सरकार बनवण्यासाठी अमित शाहांना पाठिंबा मागितला आहे.

18:29 (IST) 2 Mar 2023
नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपीला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…

नागालँडचे भाजपा आणि मित्रपक्ष असलेल्या एनडीपीपी पक्षाने विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठला आहे. एनडीपीपी आणि भाजपाला ६० पैकी ३७ जागा मिळाला आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत नागालँडच्या जनतेचं आभार मानले आहेत. “नागालँडच्या लोकांनी एनडीपीपी आणि भाजपाला दिलेल्या आशीर्वादाला धन्यवाद मानतो. डबल इंजिनचं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल,” असं पंतप्रधानांनी म्हटलं.

16:56 (IST) 2 Mar 2023
नागलँडमध्ये एनडीपीपी अजूनही आघाडीवर

एनडीपीपी – ३७

काँग्रेस – ०

एनपीएफ – २

16:55 (IST) 2 Mar 2023
मेघालयात एनपीपी पक्ष आघाडीवर; कोणालाही बहुमत नाही

एनपीपी – २५

भाजपा – ४

काँग्रेस – ५

16:55 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात भाजपा एकहाती सत्तेकडे

भाजपा – ३३

टिपरा मोथा पार्टी – १३

कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) – १४

15:27 (IST) 2 Mar 2023
नागालँडमध्ये घडला इतिहास; ६० वर्षात पहिल्यांदाच महिला उमेदवार विजयी

नागालँड विधासनभा निवडणुकीत पहिल्यांदा एक महिला उमेदवार विजयी झाली आहे. एनडीपीपी च्या उमेदावर हेकानी जाखलू या दिमापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवारा पराभव केला आहे.

15:12 (IST) 2 Mar 2023
मेघालयात एपीपीचे २५ उमेदवार आघाडीवर, तर काँग्रेसचे ५ अन्..

मेघालयात एनपीपी पक्षाचे २५ उमेदवार आघाडीवर आहे. तर, काँग्रेसचे ५ आणि भाजपाचे ३ उमेदवार पुढं असल्याचं दिसत आहे. येथे बहुमतासाठी ३१ च्या आकड्याची गरज आहे. अद्यापही हा आकडा कोणालाही पार करता आला नाही. त्यामुळे येथे त्रिशंकू परिस्थिती असल्याचं दिसत आहे.

15:05 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरा आणि नागालँडमध्ये चित्र स्पष्ट, भाजपाचं ‘कमळ’ फुलणार; पण मेघालयात…

त्रिपुरात भाजपाचा ११ जागांवर आपला उमेदवार निवडून आला आहे. तर, २२ ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत. टिपरा मोथा पार्टीचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर, ८ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.

13:46 (IST) 2 Mar 2023
“हारकर जीतने वाले को…”, नागालँडमध्ये सत्तेच्या जवळपास पोहचल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांचं ट्वीट

नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपी ३९ जागांसह आघाडीवर आहे. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी सूचक ट्वीट केलं आहे. ट्वीट करत तेमजेन इम्ना अलॉन्ग म्हणाले की, हारकर जीतने वाले को…. कहते है!

दरम्यान, तेमजेन हे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अलोंगटाकी मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत. सुरुवातीला ते पिछाडीवर होते. पण, जसे आघाडीवर आले, त्यांनी संबंधित ट्वीट केलं आहे.

12:59 (IST) 2 Mar 2023
नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षालही मिळाल्या ‘इतक्या’ जागा

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष पार्टीचा उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.

12:22 (IST) 2 Mar 2023
नागालँडमध्ये एनडीपीपीने पार केला बहुमताचा आकडा; मेघालयात एनपीपी २६ जागांवर आघाडीवर

नागालँडमध्ये भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर, मेघालयात एनपीपी २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस ५ आणि भाजपा ६ जागांवर मेघालयात समाधान मानावं लागत आहे. अद्यापही मेघालयात स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही.

12:15 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात भाजपाने पार केला बहुमताचा ‘आकडा’

त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे. भाजपाने बहुमताला लागणारा ३१ चा आकडा पार केला आहे. भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) ११ आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढं आहे.

11:26 (IST) 2 Mar 2023
मेघालयात एनपीपी पक्ष आघाडीवर

एनपीपी – २०

भाजपा – ६

काँग्रेस – ६

टीएमसी – ५

टीपीपी – ६

11:25 (IST) 2 Mar 2023
नागालँडमध्ये सत्ताधारी एनडीपीपी पक्षाची आघाडी कायम

एनडीपीपी – १८

भाजपा – ८

काँग्रेस – ५

एनपीपी – १

जनता दल ( युनायटेड ) – २

11:20 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात पुन्हा एकदा भाजपा आघाडीवर

भाजपा – ३०

टिपरा मोथा पार्टी – ११

कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) – ११

काँग्रेस – ६

10:55 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात कम्युनिस्ट पार्टी भाजपाचा मोठा ‘गेम’ करणार? नक्की घडतंय काय

त्रिपुरात भाजपाला कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) ला मोठी फाइट देत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा २६ जागांवर आघाडीवर आहे. तर कम्युनिस्ट पार्टी २० जागांवर पुढं आहे. तर, त्रिपुरातील राजघराण्याचा पक्ष असलेला टिपरा मोथा पार्टी १३ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

10:25 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात बदललं गणित, बहुमतासाठी भाजपाला करावी लागत आहे कसरत

त्रिपुरात अचानक आकडेवारीत बदल झाला आहे. सुरुवातीला ४० जागांवर आघाडीवर असलेली भाजपा आता २९ जागांवर पुढं आहे. बहुमतासाठी ३१ जागांची गरज आहे. तर, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा बाहदोवली येथील मतदासंघातून आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

09:48 (IST) 2 Mar 2023
मेघालय आणि नागालँमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट; तर त्रिपुरात भाजपाला…

त्रिपुरात भाजपा ३६, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) १५ टीएमसी ९ जागांवर आघाडीवर आहे. नागालँडमध्ये एनडीएचा घटकपक्ष एनडीपीपी ३७, एनपीएफ ८ आणि काँग्रेस २ तर अपक्ष १३ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मेघालयात एनपीपी २७, काँग्रेस ५ आणि भाजपा ७ जागांवर आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

09:18 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपा आघाडीची घौडदौड सत्तेकडे; तर मेघालयात…

त्रिपुरात भाजपा ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) १५, टीएमपी ६ जागांवर पुढं आहे. नागालँडमध्ये एनडीचा घटकपक्ष असलेला एनडीपीपी ५०, एनपीएफ ६, तर काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी २२, भाजपा १०, टीएमसी १०, यूडीपी ८ आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

08:41 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात ६० पैकी ३४ जागांवर भाजपा तर टीएमपी आणि टीएमसी…

त्रिपुरात भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ६० पैकी ३४ जागांवर भाजपावर आघआडीवर आहे. तर, टिपरा मोथा पार्टी ( टीएमपी ) ५ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.

08:22 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरात भाजपा १६ जागांवर आघाडीवर, नागालँडमध्ये…

त्रिपुरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ६० जागांपैकी १६ ठिकाणी भाजपा मतमोजणीत पुढं आहे. तर, तृणमूल काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. तर, नागालँडमध्ये एनडीएत असणारा एनडीपीप पक्ष ६ ठिकाणी आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी हा पक्ष आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

08:08 (IST) 2 Mar 2023
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये मतमोजणीला सुरुवात

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

06:54 (IST) 2 Mar 2023
Tripura Election Results : त्रिपुरात ६० जागांसाठी ८१ टक्के मतदान…

त्रिपुरात ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान पार पडलं आहे. एकूण २५९ उमेदवारांनी आपलं नशीब या निवडणुकीसाठी आजमावलं होतं. येथे ८१.१ टक्के मतदान झालं. राज्य मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितल्यानुसार, ३ हजार ३३७ मतदान केंद्रावर मतदान झालं होतं. यामध्ये ११०० मतदान केंद्र संवेदनशील आणि २८ अतिसंवेदनशील होती.

06:50 (IST) 2 Mar 2023
Meghalaya Election Results : मेघालयात ७४.३२ टक्के झालं होतं मतदान…

मेघालय विधासभेच्या ६० जागांसाठी मतदान पार पडलं आहे. येथे २१.६ लाख मतदान असून, ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये ३६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस आणि अन्य राज्यस्तरीय पक्षांनी या निवडणुकीत मोठी लढत दिली होती.

06:38 (IST) 2 Mar 2023
Nagaland Election Results : नागालँडमध्ये १८३ उमेदवारांनी लढली निवडणूक

नागालँड विधानसभेसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ६० जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान पार पडलं. येथे १३ लाख मतदार असून, ८२.४२ टक्के मतदान झालं होतं.

Assembly Election 2023 Result Updates Tripura, Meghalaya, Nagaland Vote Counting Live : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड कोणाची येणार सत्ता?