Jammu & Kashmir and Haryana Assembly Elections 2024 Date Schedule Updates : जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जम्मू काश्मीर येथे विधानसभेची निवडणूक १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून तीन टप्प्यांत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर, हरियाणा येथे १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया (Assembly Elections) पार पडणार असून १२ ऑगस्टपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना १२ ऑगस्ट रोजी निघेल. तर, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यांत, २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात तर, १ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. तर, हरियाणात १ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होऊन ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील(Assembly Elections) लोकांना त्यांचे नशीब बदलायचे आहे. मतदार मोठ्या संख्येने येतील आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढेल असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७.९ लाख मतदार आहेत जे मतदानाचा हक्क बजावतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, संसदीय निवडणुकीनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे आणि केंद्रशासित प्रदेशात लोकशाही बळकट झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ११ हजार ८३८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यात ४२.६ लाख महिलांसह ८७.०९ लाख मतदार आहेत, जे त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील.

हरियाणात केव्हा निवडणुका?

हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तारखांच्या घोषणेपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्यात २० हजार ६२९ मतदान केंद्रे आहेत. हरियाणात २ कोटींहून अधिक मतदार असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राज्यातील मतदार यादी २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >> ‘मायबाप सरकार’ हे कालबाह्य प्रारूप; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

या महिन्यात निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मी आणि हरियाणा या दोन्ही राज्यांना भेट दिली होती. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता , सर्व उमेदवारांना सुरक्षा कवच दिले जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी सांगितले की, निवडणूक आयोगाला ला केंद्रशासित प्रदेशामधील प्रत्येक मतदारसंघातून सरासरी १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे. जम्मू काश्मीरमध्ये ८० जागांसाठी मतदान होणार आहे.