पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणूक निकाल जाहीर झाले असून, काँग्रेसनं निवडणूक निकालासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांवरील निवडणूक निकालांवरील चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. करोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वादळी ठरलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसह आसाम, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी या राज्यातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेला असतानाच पाचही राज्यात निवडणूका झाल्या असून, देशातील परिस्थिती चिंताजनक झाली. त्यातच आज निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

निवडणूक निकालांवरील वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “जेव्हा देश एका अभूतपूर्व संकटाला सामोरा जात आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे. आपण त्यांना जबाबदार धरायला नको आणि त्याचबरोबर निवडणुकीतील विजय आणि तोटा यावरील चर्चा करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीवरील वादविवाद चर्चांमध्ये आमचे प्रवक्ते सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला आहे,” असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

निकालांमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन

पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. पाचही राज्यांत काँग्रेसला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. आसाम वगळता सगळीकडेच कांग्रेसचा प्रचार निष्प्रभ ठरल्याचं दिसत आहे.