Assembly Election Results 2021 Live Updates : Kerala, Assam, Puducherry, Tamil Nadu (TN) Election 2021 Results Live Coverage :
केरळ
पश्चिम बंगाल वगळता इतर तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेनं बहुमत दिलं आहे. एलडीएफने ९३ जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. यूडीएफ ४३ जागांवर आघाडीवर आहे.
आसाम
आसामात सत्ता भाजपानं दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपात चुरस होती. मात्र, भाजपानं सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. भाजपाने बहुमताचा आकडा पार करत ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपाला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे.
तामिळनाडू
सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात तामिळनाडूमध्ये लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेनं द्रमुकच्या पदरात मतं टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. द्रमुक १४१ जागी आघाडीवर आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक ८९ जागांवर आघाडीवर आहे.
पुदुचेरी
३० सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपारनंतरही स्पष्ट झालेले नाहीत. पुदुचेरीत कुणाची सत्ता येणार याचा सस्पेन्स कायम असून, भाजपाने १० जागांवर विजय मिळविला असून, ४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपा बहुमतापासून फक्त ६ जागांनी पिछाडीवर आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. यात दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पुदुचेरीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता आहे.
चार महत्त्वाच्या राज्यांच्या गर्दीत केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणूक निकालाकडे कुणाचंही फारसं लक्ष गेलं नाही. मात्र, पुदुचेरीत चांगली चुरस बघायला मिळत आहे. विधानसभेच्या ३० जागांसाठी पुदुचेरी निवडणूक होत असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत सस्पेन्स कायम आहे. भाजपाने १० जागांवर विजय मिळविला असून, ४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपा बहुमतापासून फक्त ६ जागांनी पिछाडीवर आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. यात दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं भाजपाचं आव्हान परतवून लावतं दणदणीत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. द्रमुक १३९ जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे. दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसऱ्यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ९२ जागांवर आघाडीवर आहे. तर तिकडे पुदुचेरीत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. पुदुचेरीत बहुमतासाठी १६ जागां आवश्यक असून, सध्या भाजपा ९, तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये मात्र, भाजपाने आपली सत्ता राखली आहे. सध्या भाजपाने ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे.
पाच राज्यांपैकी केरळमध्ये वेगळा निकाल बघायला मिळाला. केरळात पहिल्यांदाच सत्तांतराचा इतिहास बाजूला ठेवत एलडीएफकडे दुसऱ्यांदा राज्याची सत्ता सोपवली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पसंती देत मतदारांनी भरघोस मतदान टाकल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होतं आलं आहे. चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्या विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं आहे.
पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल घोषित होत आहेत. जवळपास पाचही राज्यात चित्र स्पष्ट झालं असून, अनेक ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे. करोना परिस्थिती असताना गर्दी करुन कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या जल्लोषाची निवडणूक आयोगाने गंभीर दाखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवलं असून, निवडणूक मिरवणुकींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा घटना घडणाऱ्या क्षेत्रातील जबाबदार पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता राखली असून, आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. हाती आलेल्या कलावरून आसामचे भाजपाचे मुख्यमंत्री सोनभ्रद सोनोवाल यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन करत असल्याचा दावा केला आहे.
तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार असल्याचे संकेत एक्झिट पोलमधून देण्यात आले होते. ते खरे ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुकची घसरणं होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलेले आकडे तंतोतंत खरे ठरले नसले, तरी आसपास दिसत आहेत. २३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेत द्रमुक सध्या १३५ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहे.
Republic TV-CNX
अद्रमुक आघाडी – ५८ ते ६८, द्रमुक आघाडी – १६० ते १७०, एएमएमके आघाडी – ४ ते ६.
P-MARQ
अद्रमुक आघाडी – ४० ते ६५, द्रमुक आघाडी – १६५ ते १९०, एएमएमके आघाडी – १ ते ३.
देशात करोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या केरळने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारला कौल दिल्याचं दिसत आहे. करोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव होऊनही केरळने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनी करोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची दखल मतदारांनी घेतल्याचं दिसत आहे. कारण केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तांतर होते. मागील काही वर्षांनंतर पहिल्यांदाच दुसऱ्यांदा सरकार सत्तेत येताना दिसत आहे.
अभिनेते आणि मक्कल नीधी मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनीही तामिळनाडू विधानसभा निवडणूक उडी घेतलेली आहे. कमल हासन हे कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये कमल हासन यांनी आघाडी घेतली. मात्र, आता लीड कमी होताना दिसत आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे मयूर राजकुमार हे निवडणूक लढवत असून, दोघांमध्ये सध्या अटीतटी लढत बघायला मिळत आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला धोबीपछाड देत द्रमुकने जोरदार मुसंडी मारली आहे. २३४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत द्रमुक १३९ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीचे कल आल्यानंतर द्रमुक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असून, पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी होताना दिसत आहे. 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं असलं, तरी इतर चार राज्यांतील निवडणुकाही महत्त्वाच्या ठरल्या आहेत. तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी या चार राज्यांमध्ये वेगवेगळं चित्र दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, हे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर महत्त्वाचे कल दिसून आले आहेत. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाने मुसंडी मारली आहे. भाजपा बहुतपेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर कांग्रेस पिछाडीवर आहे. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ आघाडी ८९ जागांवर आघाडीवर आहेत. तर तामिळनाडूमध्ये विरोधी बाकांवरील द्रमुक सत्तेत येताना दिसत आहे. २३४ जागा असलेल्या विधानसभेत द्रमुक १४२ जागी आघाडीवर आहे. तर पुदुचेरीमध्ये भाजपाने १० जागा, तर काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
मक्कल नीधी मय्यम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन यांनीही तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. कमल हासन स्वतः दक्षिण कोईम्बतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, मतमोजणी सुरू झाल्यानंतर ते मतदारसंघात दाखल झाले.
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते पलक्कड मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असून, सुरूवातीच्या काही फेऱ्यानंतर ते आघाडीवर आहेत.
केरळमध्ये भाजपा पुन्हा एकदा निष्प्रभ ठरताना दिसत आहे. केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा दावा त्यांनी केला होता. कोन्नी आणि मांजेश्वर या मतदारसंघातून सुरेंद्रन हे निवडणूक लढवत असून, दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत. कोन्नी मतदारसंघात ते तिसऱ्या स्थानी आहे, तर मांजेश्वर मतदारसंघात दुसऱ्या स्थानी आहेत.
केरळमधील मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीचे कल हाती येताना दिसत आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन, आरोग्य मंत्री के.के. शैलजा, काँग्रेसचे नेते ओमेन चंडी आणि रमेश छेन्नीथाला हे महत्त्वाचे नेते सध्या आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगाल वगळता तीन राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये लोकांनी सत्तांतराला कौल दिल्याचं दिसत आहे. द्रमुकने सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच मुसंडी मारली असून, ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक ४२ जागांवर आघाडीवर आहे. केरळ आणि आसाममध्ये मात्र अनुक्रमे एलडीएफ आणि भाजपा या सत्ताधारी आघाडीवर आहेत. एलडीएफ ७८ जागांवर आघाडीवर आहे. तर यूडीएफ ४१ जागांवर पुढे आहे. आसाममध्ये भाजपा ६९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. पुदुचेरीत भाजपा ८, तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुदुचेरीत सत्तांतर होण्याचे कल दिसत आहेत.
अद्याप ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. सुरुवातीला पोस्टल बॅटलची मतमोजणी करण्यात आली. पोस्टल बॅटलमध्ये तामिळनाडूमध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तर आसाम भाजपा, केरळमध्ये एलडीएफ हे सत्ताधारी आघाडीवर आहेत. तर पुदुचेरीमध्ये मात्र सत्तांतराचे संकेत मिळत आहे. काँग्रेस पिछाडीवर असून, भाजपाने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे.
मतमोजणीला सुरुवात होऊन तास उलटून गेला आहे. अद्यापही पोस्टल बॅलट मतांची मोजणी सुरू असून, आसाममध्ये भाजपा सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. सकाळच्या कलामध्ये भाजपा १९ जागांनी आघाडीवर असून, काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. तामिळनाडूत द्रमुक आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलावरून अंतिम चित्र स्पष्ट होत नसलं, तरी सध्या द्रमुक १८ जागांवर आघाडीवर आहे. २३४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत द्रमुक सत्तेत येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे.
केरळमध्ये दर वर्षांनी सत्ता बदल होतो, मात्र यंदा मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला पुन्हा संधी मिळेल असा जनमत चाचण्यांचा कौल आहे. राज्यात १४० जागा असून, ११४ मतदान केंद्रे आहेत. येथे डाव्या आघाडीपुढे काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे आव्हान आहे. विजयन यांच्या प्रतिमेमुळे राज्यात सत्ताबदलाची शक्यता कमी असल्याचा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे.
पाचही राज्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू आहे. केरळमधील एका मतमोजणी केंद्रावरील दृश्य...
पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम, पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजपाप्रणीत एनडीएच्या पारड्यात मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. ३० जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेमध्ये बहुमतासाठी अवघ्या १६ जागांची आवश्यकता आहे.
Republic-CNX
एनडीए – १६ ते २०
एसडीए – ११ ते १३
इतर – ०
ABP-C Voter
एनडीए – १९ ते २३
एसडीए – ६ ते १०
इतर – १ ते २
दरम्यान, १४० जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचीच पुन्हा सरशी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये बहुमतासाठी ७२ जागा आवश्यक आहेत.
India Today-Axis My India
एलडीएफ – १०४ ते १२०
युडीएफ – २० ते ३६
एनडीए – ० ते २
Republic-CNX
एलडीएफ – ७२ ते ८०
युडीएफ – ५८ ते ६४
एनडीए – १ ते ५
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदींनाच एक्झिट पोलने पडती बाजू दिली असली, तरी तमिळनाडूमध्ये मात्र फासे फिरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा २३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेत यंदा बहुमतासाठीच्या ११८ जागा द्रमुक पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Republic TV-CNX
अद्रमुक आघाडी – ५८ ते ६८
द्रमुक आघाडी – १६० ते १७०
एएमएमके आघाडी – ४ ते ६
P-MARQ
अद्रमुक आघाडी – ४० ते ६५
द्रमुक आघाडी – १६५ ते १९०
एएमएमके आघाडी – १ ते ३
आसाम एकूण जागा : १२६, बहुमतासाठी : ६४
पश्चिम बंगाल एकूण जागा : २९४, बहुमतासाठी : १४८
सर्वच मतदानोत्तर मतचाचण्यांनुसार आसाममध्ये सत्ताधारी भाजपा सत्ता कायम राखेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तमिळनाडूमधील सत्ताधारी अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) आघाडीला सत्तेवरून खाली खेचून द्रमुक (डीएमके) आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज मतदोनात्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळलेल्या काँग्रेसप्रणित आघाडीला धक्का बसण्याची शक्यता काही चाचण्यांतील आकडे दर्शवतात. तर केरळमधील सत्ता पुन्हा एकदा डाव्यांकडेच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.