केजरीवाल आणि फर्नाडिस
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पहिल्याच प्रयत्नात धूळ चारून केजरीवाल यांनी मिळविलेल्या विजयाने अनेकांना १९६७ च्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली. त्यावेळी दक्षिण मुंबई मतदारसंघात मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जाणारे तसेच केंद्रातही दबदबा असलेले स. का. पाटील यांचा राजकारणात नवख्या असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांनी दणदणीत पराभव करून असाच धक्का दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीमंत सरकार!
चारही राज्यांत भाजपचेच सरकार स्थापले जाईल, हे आता स्पष्ट झाले असून त्यांचे मुख्यमंत्रीही आधीच ठरले आहेत. त्यात सर्वात श्रीमंत आहेत ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान. त्यांच्याकडे सहा कोटी २७ लाखांची मालमत्ता आहे. छत्तीसगढचे रमणसिंह यांच्याकडे ५ कोटी ६१ लाख रुपयांची तर राजस्थानच्या वसुंधराराजे यांच्याकडे ४ कोटी ४ लाख रुपयांची मालमत्ता आहे. या यादीत सर्वात ‘गरीब’(दिल्लीच्या भाषेत सांगायचे तर आम!) आहेत दिल्लीचे हर्षवर्धन. त्यांच्याकडे २ कोटी ८ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
४३ नव्याने निवडण्यात आलेल्या दिल्ली विधानसभेचे सरासरी वयोमान ४३ वर्षे असेल. यामुळे देशातील सर्वात तरुण विधानसभा होण्याचा मान या राज्याला मिळेल. तर, मध्य प्रदेश व राजस्थानचे सरासरी वयोमान अनुक्रमे ४७ व ४८ वर्षे असेल. आणि छत्तीसगडचेही जवळजवळ ४८ वर्षेच आहे.
७० दिल्लीतील विधानसभा मतदारसंघ
६९ महिला उमेदवार
०३ विजयी महिला उमेदवार
मोदींचाच विजय!
चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांना राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंग देण्याचा प्रयत्न भाजपने आणि माध्यमांनीही केला. त्यामुळेच काँग्रेसचा धुव्वा म्हणजे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब असून सार्वत्रिक निवडणुकीतही हेच चित्र दिसेल, असे भाजपकडून प्रचारिले जात आहे. या धामधुमीत गुजरातमध्येही रविवारी मोदींचाच विजय झाला. सूरत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत येथून पूर्णेश मोदी यांनी ८६ हजार मते मिळवली. काँग्रेसचे डी. एल. पटेल हे अवघी १९ हजार मते मिळाल्याने पराभूत झाले.

आकडा आणि मते
प्रचारसभांना उसळलेली गर्दी मतपेटीत प्रतिबिंबित होत नसेलही पण सभांना रोडावलेली उपस्थिती मात्र दुर्लक्षिण्यासारखी बाब नाही, असे सूचक विधान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी ट्विट केले आहे. प्रचारसभांत मोदींच्या तुलनेत राहुल यांच्या सभांना कमी गर्दी होती, त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हा शेरा मारला आहे. राजकारणात नवख्या नेत्याला कधी कमी लेखू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
खास
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो सुरेंद्रसिंग हे दिल्लीच्या कॅण्टोनमेण्ट मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.

निवडणुकीतील पराभवाचा काँग्रेसला गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यासाठी आम्ही एकत्र बसू आणि गरज पडल्यास कार्यप्रणालीतही सुधारणा करू. विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस या निवडणुकीला सामोरी गेली होती. मात्र जनादेशाचा आदर करून आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. .
पृथ्वीराज चव्हाण ,  मुख्यमंत्री

वैशिष्टय़े
*अशोक गेहलोत सरकारमधील १९ पैकी १६ मंत्री पराभूत
*दिल्लीत आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्या शाझिया इल्मी आर.के. पूरम मतदारसंघातून भाजप  उमेदवाराकडून केवळ ३२६ मतांनी पराभूत
*छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात १२ पैकी ८ जागा काँग्रेसने जिंकल्या
*मध्य प्रदेशमध्ये भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा महूतून सलग सहाव्यांदा विजयी होण्याचा विक्रम