बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एनडीएत घरवापसी केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारच्या औरंगाबाद येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत भाषण करत असताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, “तुम्ही (पंतप्रधान मोदी) मागच्यावेळी बिहारमध्ये आला होतात, तेव्हा मी दुसरीकडे (महागठबंधन) गेलो होतो. पण आता परत आलो आहे. मी आता तुम्हाला आश्वासन देतो की, यापुढे मी कुठेही जाणार नाही. मी एनडीएतच राहणार आहे.” नितीश कुमार यांनी ही कबुली देताच मंचावर बसलेल्या पंतप्रधान मोदी यांना आपले हसू आवरता आले नाही. ते मोठमोठ्या हसून नितीश कुमार यांच्या विधानाचा आनंद घेताना दिसले.
टीएमसीचा अर्थ ‘तू, मी आणि करप्शन’, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका
बिहारच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी २१ हजार ४०० कोटींच्या विकासकामांचे उदघाटन केले. यावेळी नितीश कुमार म्हणाले, “पंतप्रधान मोदी मागच्या खेपेस बिहारमध्ये आलो होते. मात्र मीच जागेवर नव्हतो. मात्र यावेळी पुन्हा मी तुमच्याबरोबर आहे. मी आता आश्वास्त करतो की इथून पुढे मी कुठेही जाणार नाही. मी तुमच्याबरोबरच राहिल.”
झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पर्यटन करण्यासाठी पती-पत्नी आले होते भारतात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दलचा उल्लेख केला. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करून आम्ही बिहारचा सन्मान केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षावरही टीका केली. ते म्हणाले, बिहारमध्ये आता डबल इंजिनचे सरकार असून घराणेशाहीच्या राजकारणाला मोठ्या फरकाने पराभूत केले जाईल. घराणेशाही राजकारण करणारे आता घाबरले आहेत. त्यांना लोकसभा लढवायची नाही, म्हणूनच ते मागच्या दाराने राज्यसभेत जाण्याची तयारी करत आहेत.
मंदिर बांधणे म्हणजे सार्वजनिक जमीन बळकावण्याचा आणखी एक मार्ग; गुजरात उच्च न्यायालयाची टिप्पणी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “बिहारमधील आधीच्या पिढ्यांना दहशतीखाली राहावे लागत होते. राज्याबाहेर स्थलांतर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. मात्र यापुढे ते दिवस पुन्हा येणार नाहीत.” या सभेला मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल राजेंद्र व्ही. आर्लेकर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा आणि काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते.