प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला एक सर्वात मोठा लघुग्रह (अवकाशातील खडकाचा तुकडा) पृथ्वीजवळून गेला, त्याच्या रडार प्रतिमा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या लघुग्रहाचा एक चंद्रही (नैसर्गिक उपग्रह) आहे.
‘२००४ बीएल ८६’ असे या लघुग्रहाचे नाव असून, तो २६ जानेवारीला पृथ्वीपासून १२ लाख किलोमीटर म्हणजे पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतराच्या तीनपट अंतरावरून गेला.
नासाच्या ७० मीटर डीप स्पेस नेटवर्क अँटेना या कॅलिफोर्नियातील गोल्डस्टोन येथे असलेल्या यंत्रणेने या लघुग्रहाच्या वीस प्रतिमा टिपल्या आहेत.
पृथ्वीच्या जवळ २०० मीटर किंवा त्यापेक्षा मोठे १६ टक्के लघुग्रह असून ते द्वैती आहेत किंवा त्यांना दोन चंद्र आहेत असे सांगितले जाते. आताच्या २००४ बीएल ८६ या लघुग्रहाच्या मार्गाची कल्पना होती असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला. हा लघुग्रह पुढील दोन शतके तरी आता पृथ्वीच्या इतका निकट येणार नाही. यानंतर २०२७ मध्ये १९९९ एएन १० हा लघुग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे.
लघुग्रह २००४ बीएल ८६ हा ३० जानेवारी २००४ मध्ये लिंकन निअर अर्थ अ‍ॅस्टरॉइड रीसर्च सव्‍‌र्हेमध्ये न्यू मेक्सिकोतील व्हाइट सँड्स येथून शोधून काढण्यात आला होता.

लघुग्रह- २००४ बीएल ८६
पृथ्वीपासून अंतर-१२ लाख किलोमीटर
लघुग्रहाचा शोध लागलेले वर्ष-३० जानेवारी २००४
विशेष- या लघुग्रहाला नैसर्गिक चंद्र आहे.
यापुढे पृथ्वीजवळ येण्याचा कालावधी- २०० वर्षांनी
पृथ्वीजवळून जाणारा यापुढील लघुग्रह – १९९९ एएन १०

Story img Loader