केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका ज्योतिषाकडे आपले भविष्य बघताना दिसून आल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. आश्चर्याचीबाब म्हणजे या ज्योतिषाने स्मृती इराणी एकेदिवशी भारताच्या राष्ट्रपती होतील अशी भविष्यवाणी वर्तविली आहे.
राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्यासमोर हात दाखवून आपले भविष्य ऐकताना स्मृती इराणींचे छायाचित्र समोर आले आहे. देशातील मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या स्मृती इराणी ज्योतिषासमोर हात पसरुन स्वत:च्या भविष्याची काळजी करताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्या वादात सापडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, स्मृती इराणी याआधीही ज्योतिष नथ्थूलाल यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना राजकारणात मोठे पद मिळेल, असे भाकित नथ्थूलाल यांनी वर्तविले होते. आता केंद्रात महत्त्वाच्या मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा नथ्थूलाल यांची भेट घेऊन त्या तब्बल चार तास नथ्थूलाल यांच्या घरी ठाण मांडून बसल्या होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत नथ्थूलाल यांनी पाटीवर काही संदेश लिहून स्मृती इराणी यांचे आगामी काळातील भविष्य वर्तवल्याचे समजते. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि शिक्षण क्षेत्राची जबाबदारी असणाऱया अशा महत्त्वाच्या मंत्रीपदी विराजमान असणाऱया नेत्याने स्वत: मात्र आपल्या भविष्यासाठी ज्योतिषाकडे जाऊन हात पसरल्याने जनमतात रोष व्यक्त केला जात आहे. याआधी देखील स्मृती इराणी आपल्या शैक्षणिक पात्रतेवरून चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
ज्योतिषाची भविष्यवाणी सांगते… स्मृती इराणी राष्ट्रपती होणार!
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका ज्योतिषाकडे आपले भविष्य बघताना दिसून आल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-11-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrologer to smriti irani you will become president one day