भारतीय खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या पहिल्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून सकाळी १० वाजता उड्डाण करण्यात आले आहे. पीएसएलव्ही-सी ३० च्या माध्यमातून अ‍ॅस्ट्रोसॅट, तसेच इंडोनिशिया, कॅनडाचे प्रत्येकी एक उपग्रह आणि अमेरिकेचे चार नॅनो उपग्रहांचे एकाच वेळी उड्डाण करण्यात आले आहे. मंगळयानाच्या यशानंतर इस्रोने ही अजून एक मोठी कामगिरी करून दाखविली आहे.
अ‍ॅस्ट्रोसॅट हे अवकाशाच्या अभ्यासाकरिता अर्पित भारताची पहिली बहुलहरी अवकाळ प्रयोगशाळा आहे. या उपग्रह मोहिमेमुळे विश्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल, असा या मोहिमेचा महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. १,६५० किलो वजनाचे हा उपग्रह पृथ्वीला ६५० कि.मी.वरून प्रदक्षिणा घालणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील हालचालींचा वेध घेणे आपल्याला शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर अवकाशातील अतिनील, कमी आणि उच्च क्षमतेच्या लहरी, कृष्णविवरसारख्या विविध हालचालींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे. अशा प्रकारे बहुद्देशीय अभ्यास करणारा हा पहिलाच उपग्रह असल्यामुळे या अभ्यासात इस्रो नासापेक्षा एक पाऊल पुढे राहणार आहे. या उपग्रहातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’, ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ आणि ‘कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ उपकरणे मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) वैज्ञानिकांनी विकसित केलेले आहेत. यातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’ हे डॉ. के. पी. सिंग यांच्या चमूने विकसित केले आहे. तर ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ हे उपकरण डॉ. जे. एस. यादव यांच्या चमूने विकसित केले असून याचा वापर अंतराळात विविध लहरींच्या उत्सर्जनाचा, आकाशगंगेची केंद्रके आणि अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या किरणांच्या उगमाचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. तर ‘कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ हे उपकरण डॉ. ए. आर. राव यांच्या चमूने विकसित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा