चीनमध्ये रविवारी सकाळी गॅस पाइपलाइनचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या परिसरात त्याचे हादरे बसले. या दुर्घटनेत १२ जणांचा जागीत मृत्यू झाला. तर १०० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील स्थिती नियंत्रणात जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवलं.

चीनमधील झांगवान जिल्ह्यातील शियान शहरात रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. गॅस पाईपलाइनमध्ये स्फोट झाल्याचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू आला. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या इमारतींना तडे गेले आहेत. तसेच काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान ढिगारा उपसण्याचं काम करत असून जखमींची रुग्णालयात रवानगी करत आहेत.

Video : आरारारा खतरनाक… इंग्लंडच्या राणीनं तलवारीनं कापला केक

स्फोट शियानच्या यान्हु बाजारात झाला. यावेळेत काही जण नाश्ता, काही जण भाजी खरेदी करत होते. त्यावेळेस हा विस्फोट झाला. त्यानंतर याची सूचना नगरपालिका कार्यालयाला देण्यात आली.या स्फोटात जिल्ह्यातील एका बाजाराचं मोठं नुकसान झालं आहे. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याची माहिती सरकारी चॅनेल सीजीटीएन टीव्हीने दिली आहे.जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader