ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. ANI या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही ५० झाली आता ANI ने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच मदत आणि बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केला शोक

शुक्रवारी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा दुखवटा राज्यात जाहीर केला आहे. ३ जून या दिवशी ओडिशात कुठलाही उत्सव किंवा तसा कार्यक्रम सादर केला जाणार नाही.

अपघात कसा झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.

जखमींवर उपचार सुरु

कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आलं आहे. जखमींना रक्ताची गरज आहे त्यामुळे जखमींना रक्तदान करण्यासाठीही आवाहन केलं जातं आहे. त्यानंतर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि भद्रक या ठिकाणी अनेक रक्तदातेही जखमींना रक्त द्यायला आले होते. ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

Story img Loader