बीजिंग : दक्षिण चीनमध्ये बुधवारी पहाटे महामार्गाचा एक भाग कोसळला, ज्यामुळे महामार्गावरील गाडया कोसळून किमान २४ जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये पाच दिवसांच्या कामगार दिनाच्या सुट्टीच्या प्रारंभीच हा अपघात घडला. गुआंगडोंग प्रांतात झालेल्या पावसामुळे रस्ता खचला.

हेही वाचा >>> पाणबुडीविरोधी ‘स्मार्ट’ प्रणालीची यशस्वी चाचणी

266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
126 killed in earthquake in Tibet news
तिबेटमध्ये भूकंप, १२६ ठार,रिश्टर स्केलवर ६.८ तीव्रता; १८८ जण जखमी
person has died in an accident on Shiv Panvel road
विचित्र अपघात एक ठार
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
India redflags Chinas 2 new counties
चीनने गिळंकृत केला लडाखचा एक प्रदेश, काय आहे प्रकरण?
india china loksatta news
चीनच्या कुरापतींवर भारताचे आक्षेप

गुआंगडोंगच्या उत्तरेकडील मीझोउ शहराच्या डाबू काउंटीमध्ये पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली. ५८.७ फुटी मार्गाचा १७.९ मीटर भाग कोसळला आणि सुमारे १८ वाहने उतारावरून कोसळली आणि एकूण ५४ प्रवासी अडकले. बुधवार दुपापर्यंत मृतांची संख्या २४ वर पोहोचली. महामार्ग खचण्यामागचे कारण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ३० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या दोन आठवडयांपासून गुआंगडोंग भागात वादळी पाऊस आणि पुराने थैमान घातला आहे.

कामगार दिनाच्या सुट्टीमुळे अधिक वाहतूक

चीनमध्ये कामगार दिनासाठी पाच दिवसांची सुट्टी असते. याच कालावधीच्या सुरुवातीला ही घटना घडली. ही सुट्टी देशाच्या चार प्रमुख सुट्टयांपैकी एक असते. यावेळी मोठया प्रमाणात लोक प्रवास करतात. या कालावधीत महामार्ग टोलमुक्त असल्याने वाहतुकीची जास्त रहदारी असते.

Story img Loader