अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून, या भूस्खलनामध्ये एक संपूर्ण गाव जमिनीत गाडले गेले आहे. या दुर्घटनेत ३५० नागरिकांचा मृत्यू झाला असून, २००० नागरीक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
बदख्शां प्रांतातील होबो बरीक या गावात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. गावातील तब्बल दोन हजार जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने सांगितले. गावातील जवळपास 300 घरे या भूस्खलनात उद्ध्वस्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.बदख्शां डोंगराळ भाग असून, गेल्या काही दिवसांपासून येथे जोरदार पाऊस सुरु होता तसेच पूरही येऊन गेला होता. बदख्शाचे राज्यपाल शहा वालिउल्लाह अदीब यांनी सांगितले कि, भूस्खलनानंतर दोन हजार नागरीक बेपत्ता असून, तीनशे घरे जमिनीत गाडली गेली आहेत. अफगाणिस्तानात भूस्खलनाच्या घटना नेहमीच होत असतात, मात्र यावेळी मोठया प्रमाणावर प्राणहानी झाल्याने हे भूस्खलन भीषण आहे.
अफगाणिस्तानात भूस्खलनात ३५० ठार, दोन हजार बेपत्ता
अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून, या भूस्खलनामध्ये एक संपूर्ण गाव जमिनीत गाडले गेले आहे
First published on: 03-05-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least 350 dead 2000 missing after afghan landslide