अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाचजण ठार झाले असून तब्बल आठजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय वेळेनुसार काल रात्री ११.३० वाजता घडली. टर्मिनल-२ च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये ही घटना घडली असून, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने विमानतळ सील केले. या गोळीबारावेळी सर्व प्रवाशी टरमॅकमध्ये एकत्रित झाले होते. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप स्थळी हलवण्यात आले. अमेरिकेत गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ला किंवा अन्य कारणांमुळे गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजच्या गोळीबारानंतर विमानतळावरील सर्व व्यवहार तात्काळ थांबविण्यात आले आहेत.
फ्लोरिडा विमानतळावर माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार; पाचजण ठार
आपलं मन नियंत्रित केलं जात असल्याचा हल्लेखोराचा विचित्र दावा
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2017 at 08:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least five dead in fort lauderdale airport shooting