भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटारी-वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) भारतीय राष्ट्रध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे. या राष्ट्रध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ध्वज तब्बल ३५० फुट इतक्या उंचीवर फडकणार आहे. त्यामुळे भारताचा तिरंगा थेट लाहोर आणि अमृतसरमधूनही पाहता येईल. अमृतसर आणि लाहोर ही दोन्ही शहरे सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर आहेत. पुढीलवर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची बीएसएफची योजना आहे. वाघा सीमेवर होणाऱ्या ऐतिहासिक संचलनाच्याठिकाणी असणाऱ्या प्रेक्षक गॅलरीच्या विस्ताराचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. दरम्यान, ३५० फुटांच्या उंचीवर उभारण्यात येत असल्यामुळे या राष्ट्रध्वजाचा आकारही खूप मोठा असेल. अटारी-वाघा सीमेवर होणारे लष्करी संचलन अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. यावेळी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांचा उत्साह पाहण्याजोगा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा