सध्याच्या यूपीए सरकारपेक्षा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार जास्त चागले होते. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाने दिलीये.
समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी यूपीए सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. द्रमुकने पाठिंबा काढल्यामुळे अल्पमतात आलेले यूपीए सरकार आता समाजवादी पक्षाच्या टीकेमुळे भविष्यात आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
सध्याच्या यूपीए सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्त्व निश्चितच उजवे होते. त्यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार सर्वसमावेशक होते. मुळात वाजपेयींसारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व देशाचे नेतृत्त्व करीत होते. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकारी उदाहरणार्थ लालकृष्ण अडवाणी हे देखील देशातील मोठे नेते होते. असे रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे. एका दूरचित्रवाहिनीवर यूपीए आणि एनडीए सरकारच्या तुलनेबद्दल विचारले असता त्यांनी वरील मत मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा