माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वाजपेयींची प्रकृती ठिक नसल्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव करणार आहेत.
आओ फिरसे दिया जलाए..
गेल्यावर्षी २५ डिसेंबरला वाजपेयींच्या वाढदिवसी राष्ट्रपती भवनाकडून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. १९९८ ते २००४ या काळात ते सलग पंतप्रधानपदावर कार्यरत होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱया कॉंग्रेसविरहीत सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते. ५० हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची शिफारस प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती.

Story img Loader