माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी मंगळवारी ८९ व्या वर्षांत पदार्पण केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी  त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी वाजपेयी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व शुभेच्छा संदेश पाठवला.भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, उपसभापती कारिया मुंडा यांनीही वाजपेयींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.     

Story img Loader