भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाजपेयींनी आज वयाची ८८ वर्षे पूर्ण करत ८९ वर्षात पदार्पण केले.
पंतप्रधानांनी वाजपेयींच्या ६ए, कृष्णा मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही वाजपेयींना पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्या. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांनीही वाजपेयींची भेट घेतली. अटलबिहारी वाजपेयींनी सर्वांच्या शुभेच्छा स्मितहास्य करत स्विकारल्याचे, भाजपचे प्रवक्ते रवीप्रसाद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा