माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त केला. सरकार त्यांचा भारतरत्न म्हणून गौरव करणार असले तरी, माझ्या मते या दोन्ही व्यक्ती विश्वरत्न असल्याचे लताजींनी यावेळी सांगितले. पंडित मदन मोहन मालवीय यांच्याविषयी मी माझ्या वडिलांकडून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. अटलजींबाबत बोलायचे तर त्यांच्यासारख्या महान व्यक्तीला मी भेटू शकले, हेच मी माझे सौभाग्य समजते, असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, लता मंगेशकर यांनी त्यांच्या ‘अंतर्नाद’ या अल्बमधील अटलबिहारींनी लिहलेल्या कवितेचा उल्लेख करत, श्रोत्यांना ऐकण्यासाठी हे गाणे ट्विटरवर टाकले आहे.


तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतान, भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान अमुल्य असल्याचे म्हटले. त्यांचे आयुष्य अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Riteish Deshmukh

Lata Mangeshkar

Narendra Modi

President of India

Shatrughan Sinha

Story img Loader