गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना १५ एप्रिलला गोळ्या झाडून हत्या केली होती. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी सन्नी सिंह, अरुण सिंह आणि लवलेश तिवारी अशा तिघांना अटक केली होती. अशातच अतिकच्या हत्येसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ( एनआयए ) कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी सुरु आहे. यामध्ये लॉरेन्सने धक्कादायक खुलासे केले आहेत. अतिक अहमदच्या हत्येसाठी तीन हल्लेखोरांना बिश्नोई टोळीतील लोकांनीच बंदुका पुरवल्या होत्या, असं लॉरेन्सने एनआयएला सांगितलं आहे.

हेही वाचा : अतिक अहमदच्या मारेकऱ्यांकडे ६ लाख रुपयांचे टर्किश पिस्तूल कुठून आले? या पिस्तूलची वैशिष्ट्ये आणि पाकिस्तान कनेक्शन जाणून घ्या

अतिक आणि अशर्रफला मारणारे तिन्ही हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोईपासून प्रेरित झाले होते. तिघेही लॉरेन्स बिश्नोई सारखा गुंड बनण्याचं स्वप्न पाहत होते. अतिकची हत्या करणारे आरोपी सन्नी सिंह, अरुण सिंह आणि लवलेश तिवारीने सांगितलं होतं की, ते बिश्नोईचे चाहते आहेत. ‘सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्सचे चाहते झालो,’ असं पोलीस चौकशीत तिघांनी म्हटलं होते.

हेही वाचा : एकटा सलमान खान नव्हे, ‘हे’ १० जण होते लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर; गँगस्टरचा कबुलीनामा वाचून सगळेच थक्क

सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुकीनेच…

अतिक आणि अशर्रफच्या हत्येसाठी जिगाना बंदुकीचा वापर झाला होता. टर्किश बनावटीच्या ही बंदूक आरोपींकडे आढळून आल्याने अनेक सवाल उपस्थित झालेले. तसेच, अतिकच्या हत्येतील आरोपी सनी सिंह बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं जात. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी ज्या बंदुकीचा वापर करण्यात आला होता, त्याच बंदुकीचा उपयोग अतिक आणि अशर्फच्या हत्येसाठी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘क्राइम तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atiq ahmed and his brother killed lawrence bishnoi zigana pistory info nia inquary ssa
Show comments