पीटीआय, लखनौ : गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना हा हल्ला झाला. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अतिक आणि अशर्रफ यांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करीत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अहमद आणि अशर्रफ यांचे गोळय़ांनी चाळण झालेले मृतदेह घटनास्थळावरून तातडीने हलवण्यात आले. सन २००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी या दोघांना प्रयागराज येथे आणण्यात आले होते.

अतिकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झासी येथे पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी अद्याप या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती माध्यमांना दिलेली नाही.