उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. रात्री उशिरा पोलिसांच्या ताब्यात असलेला माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची तीन मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलीस त्यावेळी अतिकला प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जात होती. यावेळी पोलीस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरच मारेकऱ्यांनी अतिक आणि अशर्रफवर गोळ्या झाडल्या. दरम्यान या घटनेमुळे उत्तर प्रदेशातले विरोधी पक्ष पोलीस प्रशासनावर आणि योगी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच देशभरातील इतरही नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मारेकरी अतिक आणि अशर्रफवर गोळ्या झाडत होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर प्रत्युत्तरात एकही गोळी चालवली नाही. परंतु तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळीच माहिती दिली.

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शिवकुमार यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी देखील प्रत्युत्तरात गोळ्या झाडल्या होत्या. परंतु एकही गोळी मारेकऱ्यांना लागली नाही. हल्लेखोरांनी अतिकवर गोळ्या झाडल्या त्यानंतर पोलीसही गोळ्यांनी प्रत्युत्तर देत होते. याबाबतचं वृत्त एबीपी न्यूजने प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

शिवकुमार यांनी सांगितलं की, ते त्यावेळी वृत्तांकनासाठी घटनास्थळी गेले होते. अतिक आणि अशर्रफला पोलिसांच्या गाडीने तिथे आणण्यात आलं. दोघेही पोलिसांच्या जीपमधून उतरल्यानंतर १० पावलं चालले असतील, तेवढ्यात हल्लेखोरांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिली आणि दुसरी गोळी अतिक अहमदवर झाडण्यात आली. तिसरी गोळी अशर्रफवर झाडण्यात आली. दोघेही जमिनीवर कोसळले, त्यानंतरही हल्लेखोर गोळ्या झाडतच होते. तर पोलीस त्याला प्रत्युतर देत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atiq ahmed killed eye witness says police also fired bullet against killers asc
Show comments