उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माफियात अतिक अहमदच्या हत्येच्या मुद्यावरून राजकारण तापत आहे. त्याचदरम्यान प्रयागराजमध्ये एक पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरबद्दल दावा करण्यात आला आहे की, नॅनी सेंट्रल जेलमध्ये बंद असलेला अतिकचा मुलगा अली याने हे पोस्टर छापून घेतलं आहे. प्रयागराजमधील मुस्लीम समुदायात हे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये अतिकच्या हत्याकांडामागे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असल्याचा दावा केला आहे. तसेच याला माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

यामध्ये अलीने म्हटलं आहे की, या लोकांनी आधी माझा भाऊ असदची हत्या केली, त्यानंतर माझे वडील अतिक अहमद आणि काका अशरफ यांची हत्या केली. आता हे लोक माझ्या आईच्या मागे लागले आहेत. या पोस्टरद्वारे अलीने लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपा आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना मतदान करू नये. हे अतिक अहमदच्या मुलाचं पत्र असल्याचं सांगून व्हायरल केलं जात आहे.

children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
woman doctor committed suicide by hanging herself in her residence in mohol
मोहोळमध्ये डॉक्टर महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Pune, missing girl, Balewadi, Chaturshringi Police Station, quick response, found, handed over, search, vigilance, parents, police action, Police Quickly Locate Missing girl
कौतुकास्पद : अर्ध्या तासात चार वर्षांच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश
pakistan baluchistan attack
बस अडवली, ओळख विचारली अन् २३ जणांना घातल्या गोळ्या; बलुच अतिरेक्यांनी का केले पंजाबी प्रवाशांना लक्ष्य?

हे पोस्टर अतिक अहमदचा मुलगा अलीने बनवलं असल्याचा केवळ दावा केला जात आहे. याची पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु हे पोस्टर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पत्रात अलीने कोणताही पक्ष किंवा उमेदवाराचं समर्थन केलेलं नाही. परंतु भाजपा आणि सपाला पराभूत करण्याचं आवाहन केलं आहे. या पोस्टरद्वारे अली लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं जात आहे. या पोस्टरवर अतिक अहमद, अशरफ आणि असदचे फोटो छापण्यात आले आहेत, टीव्ही ९ भारतवर्षने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा >> “शिंदे गटाचे आमदार खासगीत सांगतात…”, आमदार नितीन देशमुखांचा दावा, म्हणाले…

ज्याच्या नावाने हे पोस्टर व्हायरल होत आहे तो अतिकचा मोठा मुलगा सध्या नॅनी सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. अतिकचा दुसरा मुलगा लखनौमधल्या तुरुंगात आहे. तर अतिकचा तिसरा मुलगा असद झाशीत एका पोलीस चकमकीत मारला गेला. अतिकची अजून दोन मुलं आहेत. ही दोन मुलंदेखील अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सापडली आहेत. परंतु ते दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.