उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार असलेला गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मदला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केलं आहे. झाशीतल्या बडागाव येथील परीछा डॅमजवळ एसटीएफने असद आणि गुलामचा एन्काउंटर केला. दोघांवरही प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडे परदेशी शस्त्रं सापडली आहेत.

या दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होतं. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठार केलं. एसटीएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) अनंत देव तिवारी म्हणाले, ‘आमच्या पथकाने असद आणि मकसूदला ठार केलं आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि परदेशी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”

उमेश पाल यांची आई म्हणाली, माझ्या मुलाला सर्वांसमोर यांनी गोळी मारली होती. आजच्या कारवाईनंतर आम्हाला समाधान मिळालं. माझ्या मुलाचे खुनी मारले गेले. हे जे दोन एन्काउंटर झाले त्याद्वारे त्या दोघांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली. योगीजींचे (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री) आभार.

Story img Loader