Shaista Parveen News : माफिया आणि उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गेल्या महिन्यात काही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाच प्रयागराजमध्ये हत्या केली. आता पोलीस अतिकच्या इतर साथीदार आणि त्याच्या पत्नीच्या मागावर आहेत. दरम्यान, पोलिसांनी अतिकची फरार पत्नी शाईस्ता परवीनला माफिया घोषित केलं आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये शाईस्ता परवीनचा उल्लेख माफिया गुन्हेगार असा केला आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये लिहिलं आहे की, शाईस्ता तिच्याबरोबर शूटर्स (नेमबाज) घेऊन फिरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश पाल हत्याकांडामधील प्रमुख आरोपी आणि ज्याच्या डोक्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस आहे तो साबिर शाईस्ताचा मुख्य शूटर असल्याचं बोललं जात आहे. शाईस्ताला शोधण्यासाठी २ मे रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर प्रयागराजमधील धुमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार मौर्य यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल एक केला आहे. या एफआयआरमध्ये शाईस्ताचा उल्लेख माफिया गुन्हेगार असा करण्यात आला आहे. तसेच काही शूटर्स, अतिक आणि असदचे साथीदार मिळून शाईस्ताने एक टोळी बनवल्याचं सांगितलं जात आहे.

शाईस्ता परवीन तिचा मुलगा असदचा मित्र आतिन जफरच्या घरी थांबली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापेमारी केली. त्याआधीच शाईस्ता तिथून फरार झाली होती. या छापेमारीनंतर पोलिसांनी या एफआयआरची नोंद केली होती. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, अतिक अहमदची हत्या १५ एप्रिल रोजी झाल्यानंतर १६ एप्रिल रोजी अतिकच्या अंत्ययात्रेत शाईस्ता सहभागी होणार होती. त्यासाठी ती १६ एप्रिल रोजी आतिन जफरच्या घरी थांबली होती.

हे ही वाचा >> “काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाल्यामुळे…”, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

पोलिसांनी २ मे रोजी आतिन जफरला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआरची नोंद केली होती. याच एफआयआरमध्ये पोलिसांनी शाईस्ताचा माफिया गुन्हेगार असा उल्लेख केला आहे. आतिनने त्याच्या घरात शाईस्तासह तिच्या शूटर्सना आश्रय दिला होता होता. उत्तर प्रदेश पोलीस आता शाईस्ताचा समावेश वाँटेड माफियांच्या यादीत करणार असल्याची माहिती मिळाली आहे.