Atiq Ahmed Killed :  उत्तर प्रदेशचा कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ शनिवारी झालेल्या हल्ल्यात मारले गेले. या प्रकरणातील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधात शहाजंग पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच, पोलिसांनी एफआयआरही नोंदवून घेतला आहे. या एफआयरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “पाप पुण्याचा हिशोब…”, अतिक अहमदच्या हत्येनंतर भाजपा नेत्याचं ट्वीट; तर कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांचा हल्लाबोल

“अतिक-अशरफच्या गँगला संपवून आम्हाला प्रसिद्ध व्हायचं होतं “, असं एफआयरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. “जेव्हा आम्हाला कळलं की अतिक आणि अशरफ वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथे जाणार आहेत, तेव्हाच आम्ही त्यांना मारण्याचा डाव रचला. त्यानुसार, आम्ही पत्रकारांच्या रुपात जाण्याचं ठरवलं. पत्रकांरांच्या वेषात येऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला केला”, अशी माहिती एफआयआरमध्ये नोंदवली आहे. अतिक आणि अशरफवर हल्ला केलेल्या तिघांनाही पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

हेही वाचा >> Atiq Ahmed Killed : अतिकच्या मारेकऱ्यांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या का? प्रत्यक्षदर्शींचा मोठा दावा, म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारी संध्याकाळी अतिक आणि अश्रफ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एसएचओ मौर्या यांच्या नेतृत्वाखालील २० पोलिसांच्या पथकाच्या सुरक्षेत त्यांना मोतीलाल नेहरू झोनल हॉस्पिटलमध्ये (कॉल्विन) वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. टीममध्ये सात उपनिरीक्षक आणि १३ हवालदारांचा समावेश होता. हॉस्पिटलच्या गेटवर माध्यमांना पाहिल्यानंतर अतिक आणि अशरफ हळू चालायला लागले. दोघेही मीडियाशी बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला.”

पोलीस अॅक्शन मोडमध्ये

अतिक अहमद आणि अशर्रफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अशर्रफ यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले १७ पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. तसेच प्रयागराजमधील शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह कलम १४४ लागू (शांतता राखण्यासाठी किंवा कोणतीही आणीबाणी टाळण्यासाठी हे कलम लागू केलं जातं.) करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली आहे. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.