Atishi दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी ( Atishi ) यांनी त्यांच्या खासगी निवासस्थानातून कामकाजाला सुरुवात केली आहे. आतिशी यांनी दोन दिवसांपूर्वी हा आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचं सामान सार्वजनिक बांधकाम विभागाने फेकून दिलं. कुठलीही पूर्वसूचना न देता हे करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आता ANI जे वृत्त दिलं आहे त्यानुसार आतिशी ( Atishi ) यांनी त्यांच्या फेकलेल्या वस्तू खोक्यांमध्ये भरल्या आहेत. त्या खोक्यांसह त्या काम करत आहेत.
प्रकरण नेमकं काय?
दिल्लीतील आप सरकारच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आतिशी ( Atishi ) यांचं सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आलं आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या या निवासस्थानी राहण्यास आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचं घर सील केलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फ्लॅगस्टाफ रोड, सिव्हिल लाईन्स येथील शीश महल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि चाव्या ताब्यात घेतल्या. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शीश महल अरविंद केजरीवाल यांनी सोडलं
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन आठवड्यांनी शीश महल रिकामे करण्यात आले. मधल्या काळात आतिशी ( Atishi ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आतिशी या शासकीय निवासस्थानी स्थलांतरीत होणार होत्या. परंतु, त्यांच्याकडे याबाबतचं अधिकृत पत्र नव्हतं. दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून कोणतंही ठराविक निवासस्थान नाही. ६, सिव्हिल लाईन्समधील फ्लॅगस्टाफ रोड येथील निवासस्थानी केजरीवाल २०१५ पासून राहत आहेत. २०२०-२१ मध्ये घराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या शीश महलसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.
आजच्या व्हिडीओत काय दिसतं आहे?
आज जो आतिशी यांचा फोटो समोर आला आहे, त्या फोटोत आतिशी या त्यांच्या खासगी निवास्थानी बसल्या आहेत. त्या फोनवर चर्चा करत आहेत. तसंच त्या ज्या सोफ्यावर बसल्या आहेत त्या ठिकाणी आजूबाजूला खोकी ठेवण्यात आली आहेत. या खोक्यांमध्ये फेकून देण्यात आलेलं सामान ठेवलं आहे असं आतिशी यांनी स्पष्ट केलं आहे.
बुधवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून एक सायकल-रिक्षा आणि एक मिनी ट्रक कपाट आणि काही पुठ्ठ्याचे बॉक्स घेऊन गेले. प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर पांढऱ्या कापडाने झाकलेले होते. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की सीएम कॅम्प ऑफिस बंद करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना परिसर सोडण्यास सांगण्यात आले. यानंतर आता आतिशी सगळ्या फेकलेल्या सामानासह दिल्लीचा कारभार हाकत आहेत असं दिसून येतं आहे.
#WATCH | Delhi Chief Minister Atishi at her private residence with her belongings after the Chief Minister's residence was sealed, says CMO.
CM Atishi is seen signing a file amidst packed luggage. These are the items that were taken out from the CM residence yesterday
(Source:… pic.twitter.com/r8FEjInOEC— ANI (@ANI) October 10, 2024