दिल्लीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील नागरिक पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे हरयाणा सरकारने दिल्लीच्या वाट्याचं १०० दशलक्ष गॅलन पाणी प्रतिदीन सोडावं या मागणीसाठी दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी उपोषण छेडलं होतं. आज पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी पहाटे आतिशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात नेण्यात आले. हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी आतिशी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवारी आतिशीची तपासणी केली आणि त्यांच्या बेमुदत उपोषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. आतिशी यांनी मात्र आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याची शपथ घेतली.

हेही वाचा >> दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय असाधारण! केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“माझा रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी होत आहे आणि माझे वजन कमी झाले आहे. केटोनची पातळी खूप जास्त आहे, ज्यामुळे पुढे जाऊन याचे हानिकारक परिणाम होऊ शकतात”, असं आतिशी म्हणाल्या. या इशाऱ्यांना न जुमानता, “माझ्या शरीराला कितीही त्रास होत असला तरी, हरियाणामध्ये पाणी सोडेपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार आहे,” असे सांगून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला होता. AAP ने असा दावा केला आहे की अतिशी यांची रक्तातील साखरेची पातळी मध्यरात्री ४३ पर्यंत घसरली आणि पहाटे ३ पर्यंत ३६ पर्यंत खाली आली. त्यामुळे, आप पक्षाने रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले.

“आतिशी यांची रक्तातील साखरेची पातळी ३६ पर्यंत घसरली, त्यामुळे कत्यांना LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”, असे आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केले. दिल्लीत पाणीटंचाईचा सामना करत असताना, आतिशी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारवर प्रतिदिन १०० दशलक्ष गॅलन (MGD) पाणी सोडत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीतील २८ लाख लोकांवर परिणाम होत आहे.

दिल्लीतील नागरिक पाण्याच्या टँकवर अवलंबून

“दिल्लीचे सर्व पाणी शेजारील राज्यांमधून येते. हरियाणाच्या भाजप सरकारने १०० MGD किंवा ४६ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी रोखून ठेवले आहे, जो दिल्लीचा वाटा आहे”, असं अतिशी म्हणाल्या. सध्या सुरू असलेल्या संकटाला प्रतिसाद म्हणून, दिल्लीच्या कॅबिनेट मंत्र्यांनी जंगपुरा येथील उपोषणस्थळी बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय राजधानीत वाढलेले तापमान आणि उष्णतेच्या लाटेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेच्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी दिल्लीवासी पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atishi hospitalised after blood sugar levels drop during hunger strike sgk
Show comments