काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांच्या कंपनीकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गेले २० दिवस तुरुंगात असलेल्या झीच्या दोन संपादकांना अखेर जामीन मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने सोमवारी दोघांचा जामीन अर्ज मंजूर केला.
२७ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना अटक केल्यानंतर दोघांनी जामिनासाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त सत्र न्या. राज रानी मित्रा यांनी दिली. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि हमीपत्र घेऊन दोघांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तपासकार्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांना देश सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी चौकशीचे कारण पुढे केल्यामुळे दोन्ही संपादकांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने शनिवारी निर्णय राखून ठेवला होता.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा