देशाचे सर्वोच्च प्रतिक असलेल्या नवीन संसद भवनाचे काल(दि.१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना, नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताची साक्ष ठरणारे असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मात्र, नवीन संसद भवनाला ‘आत्मनिर्भर’ म्हणण्यावरुन काँग्रेसचे नेता जयराम रमेश यांनी टोला मारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयराम रमेश यांनी ‘आत्मनिर्भर’ संसदेचं डिझाइन वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉन प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही इमारतींचं साम्य दाखवण्यासाठी त्यांनी दोन्ही इमारतींचे फोटोही शेअर केलेत. “इंग्रजांनी बनवलेल्या सध्याच्या संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन आत्मनिर्भर संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे” अशा आशयाचं ट्विट करत जयराम रमेश यांनी टोमणा मारला आहे. जयराम रमेश यांनी सध्याच्या संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिराचेही फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा- “आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन”

दरम्यान, सध्याच्या संसद भवनाला ९२ वर्ष झाली आहेत. या संसद भवनाला लागूनच नव्या संसद भवानाची भव्य इमारत उभी राहणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे क्षेत्रफळ ६४,५०० चौरस मीटर एवढे असेल आणि त्याचा अंदाजित एकूण खर्च ९७१ कोटी रुपये असेल. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी नव्या संसद भवनाचे उदघाटन करण्याचा सरकारचा मानस आहे.